स्व. आईच्या इच्छेचा टप्पा पुर्ण करुन रोहन नेवे चे यश

एप्रिल 12, 2022 4:41 PM

जळगांव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC) मार्फत घेण्यात आलेल्या CGL-२०१९ च्या परिक्षेत रोहन श्वेता मिलींद नेवे यांची A. I. R.००४८९ या Rank ने सेन्ट्रल एक्साइज इन्स्पेक्टर पदी निवड झाली आहे.

नेवे jpg webp

रोहन नेवे हे जळगांव येथील समर्थ कॉलनीतील रहिवासी स्व. श्वेता व मिलींद वाणी (नेवे ) यांचे धाकटे चिरंजीव आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत रोहन ची आई स्व. श्वेता यांचे निधनामुळे स्वत: रोहन व त्याचे कुटुंबावर मोठा आघात झाला होता. परंतु सदरच्या आघातामुळे डगमगून न जाता धैर्याने यश संपादन करुन रोहन याने आपल्या स्व. आई श्वेता यांना श्रध्दाजंली अर्पण केली आहे. रोहनला त्याच्या यशात स्व. आई श्वेता तसेच वडील, जेष्ठ भाऊ व कुटुंबियांचे मार्गदर्शन लाभले. त्यास नेवे-वाणी परिवार व स्व. सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन, जळगांव तर्फे भावी उज्ज्वल वाटचालीकरिता शुभेच्छा !.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now