तरूणाचा महागडा मोबाईल केला लंपास

एप्रिल 10, 2022 7:29 PM

chori mobile jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । शहरातील नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीजवळून एकाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनीलंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, राकेश सुकदेव शेळके (वय-२४) रा. चिंचोली ता. जि. जळगाव हा तरूण शुक्रवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगावातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ रिक्षात बसलेला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या २० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. त्यांनी रिक्षासह परिसरात शोधा केली मोबाईल कोठेही आढळला नाही. याप्रकरणी शनिवारी ९ एप्रिल रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now