लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी जमा होणार? पण ८० लाख महिलांना मोठा झटका!

जून 8, 2026 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र ३००० रुपये खात्यात जमा झाल्यानंतर, आता सर्व महिलांना मे महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिना सुरू होऊन ७ दिवस उलटले तरी पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली असून हे पैसे नेमके कधी मिळणार, हे समोर आले आहे.

ladki bahin

सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्याचा प्रलंबित हप्ता मिळण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. जून महिन्याच्या १२ ते १५ या तारखेदरम्यान कधीही महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

८० लाख महिला लाभार्थी यादीतून बाद! काय आहे कारण?

एकीकडे पैशांची आनंदाची बातमी असतानाच, दुसरीकडे लाखो महिलांना मोठा झटका बसला आहे. प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेनंतर तब्बल ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहेत. या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.

नाव वगळण्याची मुख्य कारणे:
बँक खात्याची ई-केवायसी (e-KYC) न करणे.
ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळणे.
योजनेचे कडक निकष आणि अटी पूर्ण न करणे.

या धडक कारवाईमुळे आता राज्यातील एकूण लाभार्थी महिलांची संख्या घटून १ कोटी ६६ लाख एवढी झाली आहे. केवळ याच महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार आहे. ८० लाख महिला यादीतून बाहेर पडल्या असल्या, तरी त्यांच्यासाठी एक आशेचा किरण बाकी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू करण्यास तयार आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now