लाडक्या बहिणींसाठी खूशखबर; डिसेंबरचा हप्ता दोन दिवसात खात्यामध्ये जमा होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महाराष्ट्रातील गरजू महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु केली. या योजनेअंतर्गत १५०० रुपये महिन्याला मिळत आहे. जुलै ते नोव्हेंबर असे आतापर्यंत ५ हप्त्याचे ७५०० हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. आता निवडणूक आचारसंहिता संपली असून डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता कधी खात्यात जमा होणार? याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करीत आहे. अशातच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींचे पैसे दोन दिवसात खात्यामध्ये येतील, असे सुतोवाच दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींवा खूशखबर दिली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेय. निकष बदलले जाणार, काही महिला अपात्र ठरणार, यासारख्या चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. त्यासंदर्भात मुनगंटीवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसांत १५०० रूपये खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आलेय.
लाडकी बहीण योजनांचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत. या संदर्भात मी अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही योजना कुठेही बंद पडणार नाही. या विरोधात काँग्रेसपक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा. पात्रता आणि निकषांत बदल होणार नाहीत. फक्त अफवा पसरवत आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.