⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

कीर्तनकरांचे पोलीस निरीक्षकांविरोधात भजन आंदोलन, काय आहेत मागणी?

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । चाळीसगाव शहरात २७एप्रिल रोजी कीर्तन सुरु असताना पोलीस निरीक्षक के.के पाटील यांनी बूट घालून नारदाच्या गादीवर पाय ठेवले. तसेच कीर्तनकार राम महाराज यांना धमकी दिल्याचा आरोप कीर्तनकरांनी केला होता. या प्रकरणी यांचा राज्यभर निषेध करण्यात आला. राम कृष्णा पाटील यांनी पाटीलांविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे फिर्याद देऊन तक्रार दिली होती.

जळकेकर महाराजांनी दिलेला अल्टीमेटम संपला..
नारदच्या गादीचा अपमान आणि कीर्तनकारांना धमकवल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक के.के पाटील यांचे निलंबन व्हावे, अशी मागणी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प जळकेकर महाराजांनी केली होती. सात दिवसात निलंबन झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. मुदत संपूनही पोलीस विभागाने के.के पाटीलांचे नीलबन केले नसल्याने दि.९मे रोजी ज्ञानेश्वर जळकेकर, कृष्णा महाराज त्याच बरोबर जिल्हाभरातील कीर्तनकरांनी भजन आंदोलन सुरु केले आहे.