कथ्थक कार्यक्रमाचे उद्या आयोजन ‎

एप्रिल 23, 2022 2:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । येथील गंधर्वी कथ्थक नृत्यालय‎तर्फे दि २४ रविवार रोजी‎ सायंकाळी ७ वाजता बालगंधर्व‎ खुले नाट्यगृह येथे प्रवाह- कथ्थक नृत्याचा पारंपरिक ते‎ आधुनिक प्रवास या कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले आहे.

कट्टक jpg webp

‎या कार्यक्रमातून कथ्थक नृत्य किती‎ साध्या सोप्या पध्दतीने शिकता येते.‎ तसेच ते आकर्षकरीत्या सादर‎ करता येऊ शकते हे यातून‎ मांडण्याचा प्रयत्न केला जाणार‎ आहे. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन‎ जास्मिन गाजरे यांनी केले आहे.‎ कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पातळीवर‎ नृत्य स्पर्धा जिंकून देणाऱ्या गंधर्वी‎ कथ्थक नृत्यालयाच्या शिष्या‎ आपले नृत्य सादर करणार आहेत.‎ कार्यक्रमाला रुख्मिणी फाउंडेशन,‎ रुख्मिणी मिड टाऊन, लेवा सम्राज्ञी‎ फाउंडेशन, लेवा सखी घे भरारी‎ यांचे सहकार्य आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now