भुसावळमागे पुण्याला धावणारी विशेष एक्स्प्रेस आता नियमित; जळगावला थांबा नसल्याने प्रवाशी नाराज

मे 22, 2026 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्या नियमित एक्स्प्रेस सेवेत रूपांतर केले. यातच आता मध्य रेल्वे प्रशासनाने जबलपूर–पुणे दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे नियमित एक्स्प्रेस सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावत असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला.

train

रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गाडी क्रमांक ०२१३२/०२१३१ जबलपूर–पुणे विशेष गाडीचे रूपांतर आता नियमित साप्ताहिक एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार गाडी क्रमांक २०१६२ जबलपूर–पुणे साप्ताहिक एक्सप्रेस ही २४ मेपासून प्रत्येक रविवारी जबलपूर येथून पुण्यासाठी रवाना होईल. तर गाडी क्रमांक २०१६१ पुणे–जबलपूर साप्ताहिक एक्स्प्रेस २५ मेपासून प्रत्येक सोमवारी पुणे येथून जबलपूरकडे धावणार आहे.

या स्थानकांवर आहेत थांबे?

ही गाडी दोन्ही दिशांनी मदन महल, नरसिंहपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, बऱ्हाणपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड या स्थानकांवर थांबणार आहे.

जळगावला थांबा नाही

दरम्यान, ही गाडी आता कायमस्वरूपी साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार असली, तरी जळगाव स्थानकावर थांबा नसल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. जळगाव हे खान्देशातील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र मानले जाते. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून विविध मार्गांवर प्रवास करतात. विशेषतः पुणे आणि मध्य प्रदेशदरम्यान शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. अशा परिस्थितीत नव्याने नियमित करण्यात आलेल्या गाडीला जळगाव येथे थांबा न देण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now