जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी भुसावळ पोलिस प्रशासनाने नियोजन करत शहरासह ग्रामीण भागातील तब्बल ५६ अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. गुरुवारी रात्री मिरवणुका आटोपल्यावर त्यांची सुटका झाली.

भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ, तालुका आणि नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेते, भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीतील ज्या गावांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या तेथील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती पोलिसांनी काढून ठेवली होती. जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अशा ५६ जणांवर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या सूचनेनुसार पोलिस पथक सातत्याने लक्ष ठेवून होते. गुरुवारी सकाळपासून ही कारवाई झाली.













