वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान : शेतकरी त्रस्त

मार्च 8, 2023 4:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । धरणगाव तालुक्यात झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने अनेक गावांमधील शिवारातील पिके जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

distroyed crops jpg webp

धरणगाव तालुक्यात संध्याकाळी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. मात्र प्रचंड वादळ वार्‍याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धरणगाव शिवारात एका शेतात नारळाच्या झाडावर वीज पडून झाड जळाले.जवळ पास कुणी नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. बाभळे, गारखेडा, आनोरा, धानोरा, धरणगाव, शिवार, गंगापुरी, पष्टाने, वंजारी, खपाट, पथराड, बोरखेडा, विवरे, भवरखेडे, अंजनी परिसरातील हिंगोणे,पिंप्री कल्याने खुर्द ,कल्याणे होळ , भोद परिसरात मका ,गहू पिके वादळ वार्‍यामुळे जमीन दोस्त झालेली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now