⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

तृतीयपंथीयांना शासनाचे आवाहन, ऑनलाईन ओळखपत्रासाठी संकेतस्थळावर नोंदणी करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांचा हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथी व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण कायदा २०१९ पासून पारित केला आहे. त्यानुसार येथील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांच्या वतीने व गोदावरी टीआयसीसी यांचे सहकार्याने बुधवार दि. १ रोजी सकाळी ११.०० वाजता येथील सामाजिक न्याय भवनात एकदिवशीय मार्गदशन शिबीर संपन्न झाले. यात तृतीयपंथीयांना ऑनलाईन ओळखपत्रासाठी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित तृतीयपंथीयांचे ऑनलाईन नोंदणी करून घेतली. यावेळी मंचावर सहायक आयुक्त, योगेश पाटील, सहा.लेखाधिकारी मनीषा पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आर.डी.पवार, समाज कल्याण निरीक्षक समिर क्षत्रिय व प्रकल्प व्यवस्थापक विश्वनाथ कोळी हे होते.

जिल्हाधिकारी अभिजित राउत यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीय समाजाच्या समस्या/तक्रारी निवारण संदर्भात जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. समाज कल्याण विभागाकडून तृतीयपंथीयांना “NATIONAL PORATAL FOR TRANGENDER PERSONS” या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याबाबतची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती दिली. समाज तीयपंथीयांच्या शंका, समस्या यांचे निरासन तालुका समन्वयक किशोर माळी यांनी केले. प्रास्ताविक तालुका समन्वयक जितेंद्र धनगर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पगारे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक महेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका समन्वयक चेतन चौधरी व शिला अडकमोल, धनराज पाटील, सागर पाटील यांनी परिश्रम घेतले.

यावेळी कार्यशाळेच्या माद्यमातून उर्वरित जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या (https://transgender.dosje.gov.in) या वेबसाईटवर तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तृतीयपंथी व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड , वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल केला असेल तर शासनाचे गझेट व एफीडेव्हीट सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी तसेच अडचणी आल्यास सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क (०२५७-२२६३३२८-२९) करावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांचा वतीने करण्यात येत आहे.