आजचा सोने-चांदीचा भाव : २२ मार्च २०२२

मार्च 22, 2022 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येतेय. आज, मंगळवार, २२ मार्च २०२२ रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज सकाळच्या सत्रात सोने २२० रुपयाने महागले आहे. तर चांदी दरात ४८० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी काल सोने २१० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी दरात ५८० रुपयांची घट झाली होती.

gold

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव? Gold Silver Rate
आज गुरुवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,८७० रुपये इतका आहे. तर चांदी ६९,९५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली होती.मागील २० दिवसात सोने दरात जवळपास ४००० रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीच्या भावात ६५०० ते ७००० हजार रुपयाची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर आता दोन्ही धातूंचे दर घसरू लागले. गेल्या आठवड्यात सोने दरात जवळपास १७०० ते १८०० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदीच्या दरात जवळपास २१०० रुपयाची घसरण झाली.

गेल्या आठवड्यातील सोने दर?
जळगावमध्ये १४ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,१२० रुपये होते. तर १५ मार्च रोजी ५३,५३०, १६ मार्च रोजी ५२,७७०, १७ मार्च रोजी ५२,३५०, १८ मार्च ५२,८६० वर स्थिरावले आहेत. तर ७ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,७ ९०रुपये होते. तर ८ मार्च ला ५४,७७०, ९ मार्चला ५५,५५० असा होता. त्यानंतर हे दर सातत्याने घसरत आहेत.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर शोधा
सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now