⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

Gold Silver Rate : सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, वाचा आजचे सोने-चांदीने भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२१ । जळगाव सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या सोने (Gold Rate) दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी (Silver Rate) देखील महागली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित १४० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलो दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल सोने ४० रुपयाने महागले होते तर चांदी भावात कोणताही बदल झाला नव्हता.

आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०४० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३५० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग वाढ दिसून आली. चांदी १६०० रुपयांनी महागली होती. तर गेल्या आठवड्यात सोने ३ वेळा महागले होते. त्यात ३०० रुपयाची वाढ झाली होती. परंतु काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. तर चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.

सोन्याची शुद्धता ‘अ‍ॅप’ वर?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे

हे देखील वाचा :