प्रवाशांनो लक्ष द्या! १५ ऑगस्टपासून बडनेरा–नाशिक रोड मेमूच्या सेवेत ‘हा’ मोठा बदल

ऑगस्ट 14, 2026 5:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच बडनेरा–नाशिक रोडदरम्यान धावणाऱ्या मेमू विशेष रेल्वेला आता कायमस्वरूपी नियमित सेवेचा दर्जा देण्यात आला आहे. ही सेवा उद्या म्हणजेच १५ ऑगस्टपासून नवीन गाडी क्रमांकासह नियमित धावणार आहे.

memu jpg webp

आतापर्यंत ही गाडी ०१२११/०१२१२ या विशेष क्रमांकाने धावत होती. आता या गाडीचे नियमित सेवेत रूपांतर करण्यात आले असून, बडनेरा ते नाशिक रोडसाठी ६११३० आणि नाशिक रोड ते बडनेरासाठी ६११२९ असे नवीन गाडी क्रमांक देण्यात आले आहेत.

गाडी क्रमांक ६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू १५ ऑगस्टपासून दररोज सकाळी १०.०५ वाजता बडनेरा स्थानकातून सुटेल. व भुसावळ स्थानकावर दुपारी ३.०५ वाजता, जळगावला दुपारी ३.४० वाजता, पाचोरा येथे ४.१० वाजता आणि चाळीसगाव स्थानकावर सायंकाळी ४.४५ मिनिटाने पोहोचेल. यानंतर ही गाडी त्याच दिवशी संध्याकाळी ७.४० वाजता नाशिक रोडला पोहोचेल.

तर गाडी क्रमांक ६११२९ नाशिक रोड–बडनेरा मेमू दररोज रात्री ९.१५ वाजता नाशिक रोडवरून सुटेल. व चाळीसगावला रात्री ११.१० वाजता, पाचोरा येथे २३.४६ वाजता, जळगावला दुसऱ्या दिवशी रात्री १२.२२ वाजता आणि भुसावळ स्थानकावर रात्री १ वाजता पोहोचेल. यांनतर ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचणार आहे.

जळगाव, भुसावळसह ‘या’ स्थानकांवर थांबे

या मेमूला मार्गातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि निफाड या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थानकांदरम्यान दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१२ मेमू कोचची गाडी

बडनेरा, अकोला आणि शेगाव या विदर्भातील महत्त्वाच्या शहरांना भुसावळ, जळगाव, पाचोरा आणि चाळीसगावमार्गे नाशिक रोडशी जोडणारी ही सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मेमूची १२ कोचची संरचना असणार आहे.विशेष रेल्वेचे नियमित सेवेत रूपांतर झाल्यामुळे या मार्गावर दररोज रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार असून, प्रवाशांना विशेष गाडीच्या वेळापत्रकावर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now