जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२५ । मागच्या काही दिवसात सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने दिसून आले. ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या किमतीने विक्रमी पातळी गाठल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. आता दसऱ्यानंतर दिवाळी सण असून या सणापर्यंत सोन्याचा दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी घट झाली आहे. आज सोन्याचे दर कमी झाले असले तरीही हे भाव खूप जास्त आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्नच अनेकांना पडलेला आहे.

आज ३ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांनी घट झाली आहे. आज सोन्याचे दर १,१८,०४० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे ५२० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर ९४४३२ रुपये आहेत. आज २२ कॅरेच सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,०८,२०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी घसरले असून हे दर ८६,५६० रुपये झाले आहेत.
दुसरीकडे आज सोन्यापाठोपाठ चांदी दर देखील घसरण आहे. आज चांदी दरात प्रति किलो २००० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर १,५१,००० रुपयावर पोहोचला आहे.
दरम्यान दसऱ्याच्या शूभमूहूर्तावर अनेकजण सोनं खरेदी करतात. काल दसरा सण होता आणि या दिवशी सोन्याचे दर वाढलेलेच होते. तरीही सोने खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून आली. दरम्यान, आज सोन्याचे दर घसरले आहे.












