जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्यासह चांदी दरात मोठी घसरण; आजचे नवीन दर तपासून घ्या

जुलै 24, 2026 3:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झालीय. सोबतच चांदीचा दर पुन्हा घसरला असून यामुळे दागिने खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सलग आठ दिवसांच्या तेजीला विराम मिळत आज सोन्याचा दर २ हजार रुपयांनी, तर चांदीचा दर ४ हजार रुपयांनी खाली आला आहे.

gold silver jpg webp

जळगावच्या सुवर्णनगरीत काही दिवसापासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत होते. मात्र, आजच्या व्यवहारात दोन्ही धातूंच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याने बाजारात पुन्हा खरेदीला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आजच्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा (जीएसटीसह) १ लाख ४७ हजार २९० रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीचा दर (जीएसटीसह) २ लाख २९ हजार ६९० रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.

सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेत रुपयातील हालचाल आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सोनं-चांदीच्या किमतींवर होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतही दरांमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, आगामी सणासुदीचा हंगाम आणि विवाहसराई जवळ आल्याने दर घसरताच ग्राहकांनी खरेदीसाठी सराफा बाजाराकडे मोर्चा वळवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजची दरकपात ही सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now