जळगाव लाईव्ह न्यूज । सुवर्णनगरी जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरांमधील चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला घसरण झाल्यानंतर आता सोन्याच्या भावात पुन्हा तेजी पाहायला मिळत असून, गेल्या दोनच दिवसांत सोनं तब्बल २५०० रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र तब्बल ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज बुधवारी २४ कॅरेटच्या १ तोळे सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली असून लग्नसराई संपल्याने दागिन्यांची मागणी कमी झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणामही स्थानिक सराफा बाजारावर होत असून, त्यामुळे दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत.

दोन दिवसांत सोनं २,५०० रुपयांनी महाग
मंगळवारी १ तोळे २४ कॅरेट सोन्याचा विनाजीएसटी दर १ लाख ४३ हजार रुपये होता. बुधवारी त्यात २ हजार रुपयांची वाढ होऊन दर १ लाख ४५ हजार रुपये झाला. आज पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोन्याचा दर १ लाख ४५ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
चांदी ५ हजारांनी घसरली
बुधवारी प्रति किलो चांदीचा विनाजीएसटी दर २ लाख ३० हजार रुपये होता. आज त्यात ५ हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचा दर २ लाख २५ हजार रुपये प्रति किलो झाला आहे.












