आजचा सोने-चांदीचा भाव : २५ नोव्हेंबर २०२१

नोव्हेंबर 25, 2021 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर आहे. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या घसरणीला ब्रेक लागला असून आज चांदीच्या भावात प्रति किलो १३० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल जळगाव सराफ बाजार पेठेत १० ग्रॅम सोने तब्बल ५०० रुपयांनी स्वस्त झालं होतं; तर चांदी प्रति किलो २११० रुपयांनी स्वस्त झाली होती.

gold rate 2

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज गुरुवारी सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४८,५५० रुपये इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,१०० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे भारतीय बाजारात सोने चांदीचे भाव वाढताना दिसून आले. ऐन सणासुदीत सोने आणि चांदीचा भाव वधारला होता. दरम्यान, गेल्या ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या भावात १६८० रुपयाची वाढ झाली होती. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील मोठी वाढ दिसून आली. गेल्या महिन्यात चांदीच्या भावात ५५०० हजार रुपयाची वाढ झाली. त्यामुळे ऐन सणासुदीत सोन्याचा भाव ४९ हजारांवर गेले होते.

त्यानंतर या चालू महिन्यात सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ दिसून आली. दिवाळीपर्यंत ४९ हजाराच्या घरात असलेल्या सोन्याच्या भाव दिवाळीनंतर ५० हजारांवर गेले होते. तर दुसरीकडे चांदीच्या भाव देखील ६८ हजारांवर गेलं होतं. दरम्यान, आता सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे सोने-चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे. असं असतानाही मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली.

गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात १६६० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात ३५५० रुपयाची घसरण झाल्याची दिसून येतेय. दरम्यान, सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याने खरेदीदारांना खरेदीची ही चांगली संधी आहे.

तीन दिवसातील सोने आणि चांदीचे दर

२२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६७,०९० रुपये असा होता. २३ नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६६,०८० रुपये असा होता. २४ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,९७० रुपये इतका आहे. २५ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६४,१०० रुपये इतका आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now