Gold Silver Prices : सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ

डिसेंबर 17, 2021 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी वाढ नोंदविली गेली. आज जळगाव सराफ बाजार पेठेत १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या प्रति किलोच्या दरात तब्बल १९९० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल सोने किंचित १० रुपयांने महागले होते. तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त झाली होती. (Gold Silver Price)

जळगावातील आजचा सोने-चांदीचा भाव? (Gold-Silver Rate)

जळगाव सराफ बाजारात आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४९,७९० रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे ६३,६१० नोंदवले गेले. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

जळगाव सराफ बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात चढ-उतार दिसून येत आहे. सणासुदीतनंतर सोन्याचे दर ५० हजारांवर गेले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात सोने पुन्हा एक हजार ते दीड हजार रुपयांनी स्वस्त झाले होते. परंतु आता सध्या जगावर ओमिक्रॉनच्या (Omicron) इफेक्टमुळे सोन्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे अनेकांची नजर सोन्याच्या भावाकडे लागलेली आहे. सध्या सोने काहीसे महाग होत असले तरी मात्र अजूनही सोनं विक्रमी उचांकापासून बरंच स्वस्त मिळत आहे. उचांकापासून सोने जवळपास ६५०० हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने ५६,२०० रुपये प्रति तोळा होते. आता सोने ४९,७९० रुपये प्रति तोळा आहे.

तर दुसरी चांदीच्या दरात मोठी हालचाल दिसून येत आहे. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये सोने ६६ हजारांवर होते. त्यात चालू डिसेंबर महिन्यात घसरण दिसून आलीय. या आठवड्यात चांदीच्या प्रति किलोच्या दरात जवळपास २७०० रुपयाची वाढ झाली आहे. तर सोने ७३० रुपयाने महागले आहे.

या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

१३ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,५८० रुपये असा होता. १४ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,४४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,०३० रुपये इतका नोंदविला गेला. १५ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,२४० रुपये इतका नोंदविला गेला. १६ डिसेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६१,६२० रुपये इतका नोंदविला गेला.

तुमच्याकडचे सोने खरे आही की बनावट तपासता येते…
देशात चार प्रकारचे सोने मिळतेआपल्या देशात चार प्रकारचे सोने मिळते. पहिला प्रकार शुद्ध सोने म्हणजेच 24 कॅरेट, याचे दागिने बनविता येत नाहीत. अन्य तीन प्रकारातून दागिने बनविले जातात. त्यापैकी एका प्रकारातून लोकांना ‘बनविले’ जाते. तुम्ही सोन्याच्या बाजारातील दरानेच सोने खरेदी करता. शुद्ध सोन्यासाठी जेवढे पैसे मोजता तेवढेच अशुद्ध सोन्यासाठी देखील मोजता. जर तुमची फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांतील शुद्धता ओळखता आली पाहिजे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now