जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२५ । जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एक दिवसाच्या घसरणीनंतर गुरुवारी सोने (Gold Rate) दरात पुन्हा ७०० रुपयांची वाढ दिसून आली. एकीकडे लग्नसराईचे दिवस असताना सोन्याच्या किमतीने विक्रमी पातळी गाठल्याने आता सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. यातच मार्च महिन्यात सोन्याचे दर प्रती तोळा ९६ हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. Gold Silver Rate Today

जळगावच्या सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ७९,१०० रुपये (विनाजीएसटी) तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८६,२०० रुपये (जीएसटी ८८७८०) इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर ९७००० रुपये (विनाजीएसटी) इतका आहे.
दोन दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी सोने दरात हजार रुपयाची घसरण झाली होती. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. पण आता गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे स्वस्तात दागिने खरेदी करणाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.
सोन्याचा दर ९६००० रुपयावर जाणार?
दरम्यान अमेरिका आगामी काळात नव्याने लागू केलेल्या व्यापार विषयक धोरणाची अधिक तीव्रतेने अंमलबजावणी करण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून मार्च महिन्यात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रती तोळा ९६ हजारांपर्यंत (जीएसटीसह ९८८००) पोहोचण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलरला अधिक सक्षम बनवण्यासाठी नव्याने व्यापारविषयक धोरण जाहीर केले. त्यामुळे जानेवारीत सोने ५८०० ते फेब्रुवारीच्या पहिल्या दहा दिवसात ३२०० ने महागले. नव्या धोरणाचा परिणाम म्हणून जगभरातील सर्वच देशांच्या प्रमुख बँकांनी त्यांच्या देशाची पत घसरु नये म्हणून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे दरात सातत्याने वाढ होऊन सोन्यातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, येत्या महिन्याभरात ट्रम्प सरकार आपल्या धोरणाच्या पडसादाचे अवलोकन करून त्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे करेल, असे जाणकारांचे मत आहे.