जळगाव जिल्हासरकारी योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या मार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचतगटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच बचतगटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे बचतगटाची नोंदणी असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी केल्यानंतर संबंधित बचतगटाच्या बँक खात्यात ३ लाख १५ हजार रुपये जमा करण्यात येतात. मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगटांनी कमाल मर्यादा रकमेपैकी १० टक्के हिस्सा स्वतः भरल्यानंतरच ते ९० टक्के अनुदानासाठी पात्र राहतील.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव, दुरध्वनी क्रमांक 02572263329 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button