Gold-Silver Price : सलग तिसऱ्या दिवशी सोने झाले स्वस्त, चांदी महागली

डिसेंबर 29, 2021 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रसाराने गुंतवणूकदार पुन्हा निर्बंध लागतील या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले असून त्यांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने गुंतवणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. मात्र, दुसरीकडे चांदी महागली आहे. आज सोने २० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदी २२० रुपयांनी महागली आहे.

gold silver price jalgaon

त्यामुळे आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,१७० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,९८० रुपये इतके आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्याच्या काळात सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून येत आहे. सोबतच सध्या जगावर ओमिक्रॉनचे सावट आहे. ओमिक्रॉनच्या इफेक्टमुळे देखील सोन्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२० डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,७३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५९० रुपये असा होता. २१ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,८६० रुपये इतका नोंदविला गेला. २२ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२५० रुपये इतका नोंदविला गेला. २३ डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६५० रुपये इतका नोंदविला गेला. २४ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७७० रुपये इतका नोंदविला गेला.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरू शकता. ‘‘BIS Care app’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की बनावट हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अ‍ॅपद्वारे तक्रारही करू शकता.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now