⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

Gold Silver Rate : सोन-चांदी पुन्हा महागली, आजचे ताजे दर जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । कोरोना (Corona Virus) महामारीनंतर आता मंकीपॉक्स (Monkeypox prevention) या विषाणूनं थैमान घातलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले असून त्यांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) दरात चढ उतार सुरूच आहे. कालच्या घसरणीनंतर आठवड्याच्या शेवटच्या सोने आणि चांदी पुन्हा महागली आहे.

आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ५० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात २६० रुपयाची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीने सोने प्रतीताेळा ५२,०६० रुपायांवर पोहोचले आहे. तर चांदीचा प्रति किलोचा दर ६३,२४० रुपयांवर आले आहे. दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

कोरोना महामारीनंतर आता जगासमोर मंकीपॉक्स विषाणूने संकट उभं केले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक कमॉटिडी बाजारात सोन्यासह चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आले. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तेजी दिसून आली होती. त्यांनतर या आठवड्यात देखील सोने महागले असल्याचे दिसून येतेय. या आठवड्यात सोने जवळपास ४०० ते ५०० रुपयाने महागले आहे. चांदी २०० ते ३०० रुपयांनी महागली आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२३ मे २०२२- रुपये ५२,०२० प्रति १० ग्रॅम
२४ मे २०२२ – रुपये ४२,१०० प्रति १० ग्रॅम
२५ मे २०२२ – रु ५२,३६० प्रति १० ग्रॅम
२६ मे २०२२ – रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२३ मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो
२४ मे २०२२ – रुपये ६२,७४० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६३,४३० प्रति किलो
२५ मे २०२२- रुपये ६२,९८० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.