⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ, चांदी स्वस्त, वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । गेल्या काही दिवसापासून सोने (Gold Rate)-चांदीचे (Silver Rate)दर एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून आले. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात मोठी झाली. परंतु आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीचं दरात घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे मात्र, आज सोमवारी सोने भावात वाढ झाली आहे.

आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ४० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलो दरात ३२० ची घट झाली आहे. त्यामुळे आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९०० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,०५० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

कोरोना (Corona) रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोने जवळपास ३०० रुपयांनी महागली आहे. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या सलग पाच दिवस वाढ झाली. त्यामुळे चांदी १६०० रुपयांनी महागली आहे.
सध्या जळगाव सराफ बाजारात

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.

हे देखील वाचा :