जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२१ । कोरोना (Corona) रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. जळगाव सराफ बाजारात या आठवड्यात सोने (Gold Rate) जवळपास ३०० रुपयांनी महागली आहे. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या (Silver Rate) दरात मोठी वाढ दिसून आलीय. चांदी १६०० रुपयांनी महागली आहे.

सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,८६० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३७० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.
या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला. १३ जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,९३० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,३१० रुपये इतका आहे.
हे देखील वाचा :
- सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक! जळगावात चांदी तब्बल ५ हजारांनी स्वस्त, सोनेही घसरले
- सणासुदीपूर्वीच सोने-चांदीने फोडला ग्राहकांना घाम; जळगावमध्ये सलग 9 व्या दिवशी मोठी वाढ, पहा ताजे दर?
- सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा भडका; जळगावात दोन दिवसांत तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ?
- ग्राहकांना झटका! चांदी १० हजारांची तर सोन्यात ३ हजारांहून अधिकची उसळी, आता नवीन दर काय?
- ग्राहकांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला; जाणून घ्या नवीन दर?











