ओमिक्रॉनचे सावट! सोने-चांदी पुन्हा महागली, वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

फेब्रुवारी 18, 2022 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२१ । एकीकडे ओमिक्रॉनचे (Omicron) सावट तर दुसरीकडे लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या भावात मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसापासून सोने (Gold Rate) चांदीचे (Silver Rate) दर एका विशिष्ट पातळीवरून वरखाली होत आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ नोंदविली गेली आहे. आज सोने २४० रुपयाने महागले आहे. तर चांदीच्या दरात ४५० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल मंगळवारी सोने किंचित १० रुपयाने महागले होते तर चांदी ६० रुपयांनी महागली होती.

gold silver

जळगावातील आजचा भाव? (Gold Silver price 12 January 2022)
आजच्या दरवाढीने जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,८१० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,५४० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या देशभरात ओमिक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या भावात मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ५०० रुपयांहून अधिकने घसरण झाल्याचे दिसून आले. तर चांदी दरात २१०० रुपयाची घसरण झाली आहे. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्थिर होते. तर दुसरीकडे चांदी महागली. सलग तिसऱ्या दिवशी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात चांदीच्या दरात ७०० रुपयाची वाढ झाली आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षीत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

१० जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०३० रुपये असा होता. ११ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,५७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,०९० रुपये इतका नोंदविला गेला. १२ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,८१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,४५४० रुपये इतका नोंदविला गेला.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now