सोने पुन्हा महागले; 10 ग्रॅमसाठी आता इतके पैसे मोजावे लागणार?
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२४ । सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी आलीय. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आता बुधवारी सुद्धा सोने महागले आहे. सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीमुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. काल सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्यानंतर आज मात्र, दरात वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची वाढ जागतिक तुटीमुळे झाली आहे आणि 18 डिसेंबर 2024 रोजी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात चतुर्थांश टक्के कपात करण्याच्या अपेक्षेमुळे देखील दिसून येत आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, आज बुधवारी (11 डिसेंबर 2024) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 8700 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,86,000 रुपयांवरुन 7,94,700 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 78,600 रुपयांवरुन 79,470 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.