पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात मुक्तता पण छळ प्रकरणी ३ वर्षे कारावास

ऑक्टोबर 14, 2021 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । पत्नीचा छळ केल्याच्या  प्रकरणात प्रकाश सुखलाल भिल ( वय ४५, रा. वावडदा  ता. जळगाव ह,मु .शेंदुर्णी, ता. जामनेर ) याला न्यायालयाने बुधवारी तीन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी हा निकाल दिला.

court

प्रकाशे १ जुने २०२० रोजी पत्नी मंगल हिला धरणात ठार मारले, अशी फिर्याद मृताचा भाऊ गजानन गायकवाड याने दिली होती. खुनाच्या गुन्ह्यातून प्रकाश याला निर्दोष मुक्त करण्यात आले तरी पत्नीचा छळ केल्याच्या गुन्ह्यात  दोषी ठरविले. सरकारतर्फे अधि. प्रदीप एम. महाजन यांनी बाजू मंडली.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now