भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल परिसरामध्ये आग

एप्रिल 7, 2022 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । भुसावळ येथील जामनेर राेडवरील बियाणी मिलिटरी स्कूल परिसरात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग आली. यामुळे शाळेच्या परिसरात धावपळ उडाली. पालिका अग्निशमन बंबाने ही आग आटाेक्यात आणली. दरम्यान, शाळेच्या आवारात पडलेला पाला-पाचोळा मजुरांनी पेटवल्याने हा प्रकार झाल्याचे पुढे आले.

aag

बियाणी मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वारापासून ते आतमध्ये जाणाऱ्या मार्गावर झाडांचा पालापाचाेळा पडलेला हाेता. हा सुकलेला पाला-पाचोळा जमा करून तेथील चार ते पाच मजूर ताे पेटवत हाेते. मात्र, नेमकी यावेळी जोरदार हवा सुटल्याने ही आग आजूबाजूला पसरली. त्यामुळे तातडीने पालिकेच्या अग्निशमन केंद्राला माहिती देण्यात आली. काही मिनिटांतच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. वसंत पाटील, डिगंबर येवले, दिनेश पुराेहित, विजय मनाेरे या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून पंधरा मिनिटात आग आटाेक्यात आणली. मात्र, हवेचा वेग जास्त असल्याने त्यांना आग विझवताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. दरम्यान, गेल्या काही दिवसांनापासून तापमान वाढल्यामुळे शहरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now