फैजपूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एका विरुद्ध गुन्हा दाखल

नोव्हेंबर 2, 2021 2:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील फैजपूर येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपूर शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ही मुलगी घरात एकटी असतांना गावातील अर्जून सिध्दार्थ केदारे (रा. फैजपूर) याने घरात घुसून या मुलीचा जबरदस्ती हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून मुलीचा विनयभंग केला. मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत संशयित तरुणाविरुद्ध तक्रार दिली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अर्जून केदारे याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now