एकदम खतरनाक : नवऱ्याच्या प्रेमापोटी 2 बायका रस्त्यातच भिडल्या

ऑक्टोबर 25, 2022 4:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील लोहिया जिल्हा रुग्णालयात एक वेगळीच घटना घडली आहे. ती म्हणजे नवऱ्याला पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये जोरदार भांडण झाले. अखेर हे भांडण संपवण्यासाठी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला. . राम मनोहर लोहिया रुग्णालयात हा विचित्र प्रकार घडला.

surya grhana 1 1 jpg webp

तर झालं अस कि, नवऱ्याला रुग्णालयात पाहण्यासाठी आलेल्या दोन पत्नींमध्ये जोरदार भांडण झालं. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पतीही तेथे पोहोचला आणि शेवटी दोन्ही पत्नींना त्याने चपलेने चोप दिला. महिलांच्या या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. देवेंद्र कुमार असे पतीचे नाव असून त्यांना किरण आणि पुष्पा अशा दोन पत्नी आहेत.

देवेंद्रला पाहण्यासाठी दोन्ही पत्नी गुरुवारी एकत्र लोहिया रुग्णालयात पोहोचल्या. आपत्कालीन कक्षासमोर किरण आणि पुष्पा यांच्यात बाचाबाची झाली. त्यावरुन दोघींमध्ये वाद झाला. पतीने दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी ऐकेना मग देवेंद्रने दोन्ही पत्नींना चप्पलने मारहाण केली. यानंतर दोघीही एकमेकींना धमक्या देत निघून गेल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now