जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । जामनेर तालुका देखरेख संघाच्या चेअरमनपदी डॉ.सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जामनेर तालुक्यातील ९४ विकास सोसायटींच्या मालमत्ता असलेल्या जामनेर तालुका प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार ईश्वरलाल जैन यांच्या पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले हाेते. त्यांचे सर्व १३ उमेदवार निवडून आले आहे. या देखरेख संघाच्या चेअरमनपदी भाजपचे डॉ. सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी डी. व्ही. पाटील यांनी बिनविरोध निवड घाेषीत केली.

यावेळी शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष शरद पाटील, जितेंद्र पाटील, अमित देशमुख, ऍड. बोरसे, विलास पाटील, बाबुराव गवळी, नाना पाटील, अशोक भोईटे, कमलाकर पाटील व देखरेख संघाचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. तर, चेअरमनपदी डाॅ. सुरेश पाटील यांची निवड झाल्यानंतर सभापती चंद्रकांत बाविस्कर यांनी त्यांचा सत्कार केला.
हे देखील वाचा :
- जामनेरमध्ये लाखोंच्या घरफोडीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- जामनेर हादरले! रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड आणि रॉडने जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
- फत्तेपूर सामूहिक अत्याचार प्रकरण : ११ संशयितांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; प्रमुख आरोपी अद्याप फरार
- जळगाव जिल्हा हादरला ! मित्रासमोरच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, १४ जण अटकेत
- विहीर अनुदानासाठी मागितली लाच; जामनेर पंचायत समितीचा कंत्राटी तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!







