२०० रुपयांची लाच भोवली ! जामनेरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 8, 2026 9:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला अवघ्या २०० रुपयाची स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५१) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली.

lach jpg webp

काय आहे कारवाई?

तक्रारदार यांनी जामनेर तालुक्यातील त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मोजणीनंतर आवश्यक असलेल्या स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी लोकसेवक भगवान गायकवाड यांनी ७०० रुपयांची मागणी केल्याची तक्रार ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी गायकवाड यांनी तडजोडीअंती २०० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. गायकवाड यांनी पंचांसमक्ष २०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण ठाकूर आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now