जामनेरात डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी

एप्रिल 14, 2022 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील भीम नगरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रथम भीम नगरात माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

abhivadn 1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांची रथ आमदार गिरीश महाजन यांनी चालवले तर यावेळी मिरवणुकीत आमदार महाजन यांनी लेझीमच्या तालावर ठेकाही धरला होता. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, नगरपालिका घटनेतील डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, कैलास नरवाडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, नगरसेवक सुहास पाटील, उल्हास पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पप्पू पाटील, माधव चव्हाण, संतोष झाल्टे, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर सराफ, डॉक्टर नंदलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now