जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । आजवर केलेले एक आंदोलन फसले असे दाखवावे. टोल नाक्यांवरील आंदोलनामुळे ७० टोल बंद झाले. राज ठाकरे यांनी एकतरी आंदोलन अर्धवट सोडले हे दाखवावे. पाकिस्तानी कलाकारांना देशातून मनसेनेच हाकलून लावले. रझा अकादमीविरुद्ध मनसेच उभी राहिली. तुमच्या अंगावर एक तरी गुन्हा आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

पुणे येथील आयोजित सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, औरंगाबाद नामांतरावर यु टर्न घेणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? म्हणे मी सांगतोय, अरे तुम्ही महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आहेत का? एमआयएमला मोठे करणारे कोण हेच आहेत. बघता-बघता औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार झाला. सेनेच्या राजकारणामुळे निझामांची औलाद महाराष्ट्रात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, औरंगाबादचे नाव लवकरच संभाजीनगर करा.

एमआयएमच्या अवलादी औरंगजेबच्या कबरीवर नतमस्तक होताय. शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असतील तर आपण काय करणार? शरद पवार बाळासाहेब ठाकरेंची विश्वासार्हता घालवत आहे आणि सेनेला त्याचे काहीच वाटत नाही. ६ बाय ४च्या कबरीचे रूपांतर आज १५ हजार फुटात झाले आहे. अफजल खानची मस्जिद तयार झाली आहे. त्यासाठी निधी येतो आहे. अफजल खानच्या कबरीच्या विस्तारासाठी निधी येतो तरी कुठून? आम्ही थंड गोळे आहोत.
गझनीपासून ब्रिटिशांपर्यंत सर्वांनी देशावर राज्य केले. आपण शांत आहोत, राग करीत नसल्यानेच ७०० वर्ष पारतंत्र्यात होतो. भोंग्यांचे आंदोलन एका दिवसाचे नाही. हळूहळू पुन्हा सुरू होणार, आवाज वाढणार. आता सुरू केले आहे तर एकदाचा तुकडा पाडून टाका. माझ्या २८ हजार मनसैनिकांना नोटीस गेल्या. जो कायदा न्यायालय सांगते त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना नोटीस देता आणि कायदा मोडणाऱ्यांना चर्चेला बोलावतात. ४-५ दिवसात एक महत्वाचे पत्र देणार आहे. ते प्रत्येक घराघरात पोहोचवायचे आहे.












