तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे विभागीय बैठक

मार्च 9, 2026 11:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील सुरभीनगर येथील गणपती मंदिरात ८ मार्च रोजी तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे विभागीय बैठकीचे आयोजन अरुण भास्कर धांडे यांच्या अध्यक्षतेखाली व राजेश नेहते यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.

tejodeep

प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजेश नेहते यांनी केले. दरम्यान, भुसावळ येथे २० मार्च २६ रोजी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अनंतकोटी नाट्य प्रयोगाचे आयोजनासाठी चर्चा करून नाट्यप्रयोग प्रचारपत्रकाचे विमोचन करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनच्या वसतिगृह बांधकाम करण्याकामी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी फाऊंडेशनचे सहयोगी सदस्य, कार्यकारिणी सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते बाबुराव भंगाळे, नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक शांताराम इंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, धर्मराज देवकर, नितीन भंगाळे, तेजोदीप नवविचार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष राजेश नेहते, योगेश कोलते, संदीप राणे, दिलीप झांबरे, प्रा. धीरज पाटील, दिनेश कोलते, विनायक बेंडाळे, संतोष कोलते, किरण बळीराम पाटील, किरण जर्नादन पाटील, शिशिर भंगाळे, प्रणव पाटील, वसंत कोलते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती लाभली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now