जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । सेवानिवृृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तिवेतनासाठी जिल्हा परिषदेत नेहमीच भटकंती करावी लागत असते. वेळेवर निवृत्तीवेतन भेटले नाही तर जेष्ठ नागरिकांना नाहक पायपीट करावी लागते. यामुळे जर वेतन वेळेत मिळाले तर होणारे हाल थांबतील अशी अपेक्षा जेष्ठ नागरिकांतु व्यक्त केली जात आहे.
सेवानिवृत्तांचे वेतन वेळेवर व्हावे ही मागणी रामानंदनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाने केली आहे. एक तारखेला सेवानिवृत्तांचे वेतन अदा करावे, अशी मागणीही रामानंदनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव बाविस्कर, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, रामचंद्र नारखेडे, पोपट नेमाडे, गणेश वानखेडे, अन्य ज्येष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे.