⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने मजूराचा दुर्दैवी मृत्यू

बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने मजूराचा दुर्दैवी मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून काम करणारा मजूराचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. रहीम कासम पिंजारी (५२) रा. ममुराबाद ता. जि. जळगाव असे मयत मजूराचे नाव आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहीम पिंजारी हे कुटुंबासह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे वास्तव्याला होते. ठेकेदाराकडे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगसह बांधकामचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी गणेश कॉलनी परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी ते सेंट्रींग काम करत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास काम करत असताना त्यांचा तोल गेल्याने ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणाऱ्या मजूरांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.

मयत रहीम यांच्या पश्चात पत्नी रुखसाना आणि जुबेर, तौसीफ हे दोन मुले असा परिवार आहे. रहीम यांच्या मृत्यूने त्यांच्या चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह