ज्वेलर्स दुकानावर धाडसी दरोडा; ३० लाखांचे दागिने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अंबिका ज्वेलर्स या सराफा दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यात ३० लाखांचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भर बाजारपेठेत असलेल्या सराफा दुकानातील या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

crime 69 jpg webp

अधिक माहिती अशी की, शहरातील भुसावळ रोडवर अनिल शुरपाटणे यांचे अंबिका ज्वेलर्स चे दुकान आहे. या सराफा दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यात सुमारे २५ लाख रूपयांची चांदी तर पाच लाख रूपयांच्या सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकाला माहिती दिली असून पंचनामा करून याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर जळगावहून तपासासाठी श्‍वान पथक निघाल्याची माहिती सुध्दा संचालकांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories