वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील अहिरवाडी भागात केळीचे नुकसान

जळगांव लाईव्ह न्युज |सुभाष धाडे| केळीचे आगार असलेल्या जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अहिरवाडी शिवारात ३१ रोजी झालेल्या वादळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तालुक्यातील कुंभारखेडा ,अहिरवाडी, पाडला, गौरखेडा परिसरात वादळीवाऱ्याने केळीचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक झाडे सुद्धा वादळामुळे जमीनदोस्त झाली आहे. झाडाच्या फांद्या घरावर पडल्याने घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. तर काही घरां वरील पत्रे देखिल उडल्याचे वृत्त असून विजेच्या तारा सुध्दा तुटलेल्या आहेत, काही प्रमाणात पाऊस देखिल पडला आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की रावेर तालुक्यातील कुंभारखेडा अहिरवाडी परीसरात वादळी वाऱ्याने हजेरी देत काही शेतक-यांचे केळीचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे झाडे सुद्धा पडली आहेत. काही घराचे सुद्धा नुकसान झाल्याचे वृत्त असून केळी बागांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतीत आहे.दरम्यान हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेलृयाने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.नेमकं नुकसान किती झाले याबाबत अधिक माहिती कळु शकली नाही‌.