⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव जिल्ह्यात कोरोना उपचार घेत असलेले रुग्ण आता पाच हजारच्या आत

जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. १ मे पासून सातत्याने नवीन रुग्ण कमी होत असून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत पटीत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे. आज बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात १६४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ५६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात ०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून बरे होणारे वाढू लागले आहे. यात प्रशासनाकडून लावण्यात आलेले लॉकडाउनचा देखील मोठा प्रभाव पडल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत आहे. नव्याने बाधितांची संख्या कमी होत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णही घटले आहेत. हा सर्वात मोठा दिलासा आहे. जिल्ह्यात सध्या ४ हजार ७५८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९४.८० वर गेला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३२, अमळनेर-१, चोपडा-५, पाचोरा-३५, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-११, पारोळा-६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-१५, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.