⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

विरोधकांकडून नव्हे स्व:पक्षातूनच माझे खच्चीकरण; चिमणराव पाटलांची खंत

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । राजकारणात एखाद्याचे खच्चीकरण करणे हे स्वाभाविकच आहे. परंतु सध्या माझे विरोधकांकडून नव्हे तर स्व:पक्षातील काही जणांकडून खच्चीकरण सुरु असल्याची खंत शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात काही जणांना आपले वर्चस्व सहन होत नाही, म्हणून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्ह्यात अशा कितीही कुरघोड्या झाल्या तरी त्याला भीत नाही, असा टोला आमदार चिमणराव पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता स्वकीय आणि विरोधकांनाही मारला आहे. पारोळा बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी शिवसेना स्थापनादिनाचा कार्यक्रम झाला. यात आमदार चिमणराव पाटील बोलत होते.

whatsapp image 2021 06 20 at 1.06.09 pm

शिवसेनेनेसारखं संघटन हे जगात कुठेही नाही. गेली पन्नास वर्षे एक नेता, एक वक्ता, एक संघटना ही व्याख्या जगात कुठल्याच राजकीय पक्षात नाही. सध्या राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या साडेतीन वर्षात आपण मतदारसंघात कुठलीही कामे बाकी ठेवणार नाही. आपण सत्तेत आहोत. त्यामुळे कुरघोड्या करणाऱ्यांकडे लक्ष न देता मतदार संघात विकासालाच प्राधान्य देऊ. मजबूत कार्यकर्ते आहेत त्यांच्या भरवश्यावर आपण निवडणूक लढवत आलो आहोत, असेही पाटील म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समिती सभापती अमोल पाटील, जि.प. सदस्य रोहिदास पाटील, शेतकरी संघाचे माजी चेअरमन चतुर पाटील, जि.प.चे माजी सभापती दिनकर पाटील, उपसभापती दगडू पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, भिडू जाधव, शेतकरी संघ चेअरमन अरुण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे उपस्थित होते.