---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जुन्या भांडणाच्या कारणावरून केला चॉपरने वार; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चहाच्या दुकानदाराला जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार १० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 38 jpg webp webp

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील कौतीन नगरात मनिष उर्फ गोट्या मगन पाटील (वय-३३) हा तरूण राह्यला असून त्याचे जळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चहाचे दुकान आहे. ९ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून खेडी येथील शंकर मराठे, गणेश चौधरी यांनी चॉपरने वार करून दुखापत कली.

---Advertisement---

जखमी झालेल्या मनिष पाटील याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचरार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---