जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव येथे पोलीस प्रशासनाची परवानगी काढून मनसेतर्फे येथील धुळे रोड पुलाखालील पंचमुखी हनुमान मंदिरात दि.४ रोजी सायंकाळी महाआरती संपन्न झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंगाविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून ही आरती संपन्न झाली.
या आरतीसाठी पोलीस प्रशासनाची रितसर परवानगी घेण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी होता. भोंगा हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाचे चाळीसगावातील तमाम हिंदू – मुस्लिम बांधवांनी पालन करावे अशी अपेक्षा मनसेतर्फे व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी मनसेचे शहर प्रमुख अण्णा विसपुते, तालुका प्रमुख संग्रामसिंग शिंदे, पंकज स्वार, दीपक पवार. तसेच अन्य मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.