धक्कादायक ! बनावट सही- शिक्क्यांद्वारे तयार केले नियुक्तीपत्र; भुसावळच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

मे 18, 2025 4:55 PM

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेंतर्गत भरण्यात येत असलेल्या आरोग्य सेवक या पदावर नियुक्ती मिळविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्कॅन केलेल्या स्वाक्षरीद्वारे बनावट नियुक्ती पत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नियुक्ती पत्र तयार करणाऱ्या भुसावळ येथील तरुणाविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तर उमेदवारांना देखील त्यांच्या मेल आयडीवर माहिती देण्यात आली. याच आदेशाचा संदर्भ वापरून भुसावळ येथील अमोल कैलास सुशीर याने आरोग्यसेवक पदावर नियुक्तीचा आदेश बनवून घेतला.

बनावट नियुक्ती आदेश बनवून सार्वजनिक आरोग्य विभागाचा तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा शिक्का व स्कॅन केलेली सही वापरल्याचे आढळून आले आहे. दरम्यान बनावट आदेश मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यालयीन अधीक्षकांकडून जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बनावट आदेशात व मूळ आदेशात तफावत आढळून आलेली आहे.

आरोग्य सेवक पद नियुक्तीसाठी संबंधिताने बनावट सही, शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अमोल सुशीर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment