अखेरच्या षटकात बोलावलं अन् शमीनं मैदान गाजवलं

ऑक्टोबर 17, 2022 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे नुकताच पार पडला. यात भारताने रोमहर्षक असा 6 धावांनी विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकार मोहम्मद शमी ठरला.

mahamad shami jpg webp

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात एक रोमहर्षक क्रिकेट मॅच काय असते याचा साऱ्यांनाच प्रत्यय आला. कारण सामन्याच्या अखेरच्या षटकात भारतानं विजय ऑस्ट्रेलियाकडून खेचून आणला. विशेष म्हणजे सामन्यात नसणारा मोहम्मद शमी अखेरच्या षटकात ओव्हर टाकण्यासाठी आला आणि विजयाचा शिल्पकार ठरला.

शमीने अखेरच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येकी दोन धावा दिल्यानंतर अखेरच्या चारही चेंडूत विकेट्स मिळवल्या. यातील एक विकेट रनआऊट असल्यानं शमीची हॅट्रीक हुकली पण त्यानं केलेल्या कमाल कामगिरीची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now