मोठी बातमी : अनिल देशमुखांविरुद्ध सचिन वाझे बनणार माफीचा साक्षीदार !

sachin vaze jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२२ । ज्या १०० कोटींच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ वाजवली त्या वसुली प्रकरणामुळे बडतर्फ झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे याच प्रकरणात आता माफीचा साक्षीदार बनण्यासाठी तयार झाला आहेत. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी वाझे त्यांच्याकडे असणारी सर्व माहिती पुरवणार आहेत. बीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसंच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

कोर्टाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसंच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरं जावे लागणार नाही. सचिन वाझेंनी सक्तवसुली संचालनाकडेही अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now