चिखली-तरसोद ४ पदरी राष्ट्रीय महामार्गवर वरणगांव शहरांतर्गत रस्त्याच्या विकासाचे भूमिपूजन

ऑक्टोबर 19, 2022 7:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । चिखली-तरसोद ४ पदरी राष्ट्रीय महामार्गावर वरणगांव शहरांतर्गत समांतर रस्त्याच्या विकासाचे आज रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे व भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, यावेळी बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

jalgaon 2022 10 19T190025.177

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात “चिखली – तरसोद ४ पदरी राष्ट्रीय महामार्ग” निर्मिती झाल्यावर, सदर रस्ता वरणगांव शहराच्या बाहेरून बायपास करण्यात आला होता. त्यामुळे वरणगांव शहरतील रस्त्याच्या विकासाचे काम थांबून नागरिकांना त्रास होत होता, यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून वरणगांव शहरांतर्गत समांतर रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवून आणली, सदर रस्त्यासाठी ६ महिन्या अगोदर दि.२ मे रोजी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण मार्फत रु.३,२९,९८,७०६/- निधीस मंजुरी देण्यात आली होती. सदर रस्त्यामुळे वरणगांव शहरतील नागरिकांचा त्रास कमी होऊन सुविधा मिळतील.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह आमदारसंजय सावकारे, बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी जि.प.सदस्य राजेंद्र चौधरी, माजी प.स.सभापती राजेंद्र चौधरी, वरणगांव माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, मनोहर सराफ, सुनिल माळी, हाजी अल्लाउद्दिन सेठ, शेख अखलाख, रमेश पालवे, विनोद पाटील, प्रणिता पाटील, कय्युम सेठ, अनिल राणे, बळीराम सोनवणे, मुस्लीम भाई, प्रमोद पाचपांडे, किरण भिसे, सतीश चौधरी, कैलास पाटील, मयूर भंगाळे, बाबुराव कोळी, राजेंद्र भंगाळे उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now