⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा तब्बल ५०० रुग्णांनी घेतला लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । एरंडोल येथे कोरोना महामारीमुळे व निर्बंधांमुळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम बंद होते. शासनाच्या आदेश शिथिल झाल्यामुळे यावर्षी जय श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम चौक एरंडोल यांच्या अध्यात्मिक श्री हनुमान कथा सुरू आहे. कथा विवेचन गोरक्षक राजीव महाराज यांच्या मधुर वाणीतून तरुणांना हनुमान चालीसा अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व महाराज आपल्या विवेचनातून स्पष्ट करत आहेत.

या पार्श्‍वभूमिवर ६रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ज्यात तब्बल ५०० रुग्णांनी लाभ घेतला आहे. यासाठी डॉ. स्नेहल पाटील कल्पना हॉस्पिटल एरंडोल मधुमेह तपासणे, डॉ. वैभव चौधरी यांनी नेत्रतपासणी, डॉ. राहूल पाटील यांनी बाल रोग तपासणी, नाक कान घसा तपासणे डॉ. विनोद पवार श्वास हॉस्पिटल जळगाव, डॉ. मनोज पाटील लोढा हॉस्पिटल जळगाव, यांचे सहकार्य लाभले.

यावेळी जय श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.नितीन पाटील, उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे, सदानंद पाटील, अवि जाधव, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सुमेध महाजन, राकेश झा, मनोज झा, दिनेश पाटील, ऋषिकेश महाजन, अमित पाटील, सनी पाटील, अनंत पाटील, अजय महाजन, कृष्णा गुजर, ओम पाटील, देव जाधव, धीरज पाटील, मनोज महाजन, निखिल पाटील, टोनी शिरवानी, बंटी शिरवानी, अश्विन पाटील, पुष्पक पाटील, संजय महाजन, प्रमोद चौधरी यांच्यासह सर्व जय श्रीराम प्रतिष्ठान कार्यकारिणीने शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.