जळगावचे अनिस शहा खानदेश रत्न पुरस्काराने सन्मानित

नोव्हेंबर 15, 2022 7:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थे मार्फत २०२२ चा ‘खानदेश गौरव पुरस्कार’ जळगाव ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह यांना सन्मानित करण्यात आला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातिल अल्पबचत भवन येथे शाह यांना हा पुरस्कार शिव संजीव सोनवणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

jalgaon 2022 11 15T191845.086 jpg webp

अनिस शहा यांनी कोरोना काळात कोविड पॉझिटिव्ह असलेले ११९ मृतदेह स्व हस्ते दफन केले होते तसेच काही हिंदू समाजाच्या लोकांचे सुद्धा दफन विधी केल्याबद्दल त्यांना शाह बहु उद्देशिय संस्थे तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार शिव श्री संजीव सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले त्या वेळी व्यासपीठावर पुण्याच्या श्रीमती शबनम शेख, मनियार बिरादरी चे फारुख शेख, जमीयत उलमा हिंद चे मुफ्ती हारून नदवी, धुळे चे अडव्होकेट जुबेर शेख,अडावद चे फारुक पटेल, अजमल शाह, डॉ करीम सालार व संस्थेचे अध्यक्ष फारुक शाह उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now