⁠ 
बुधवार, मे 8, 2024

एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात एक ठार, १२ प्रवासी जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १६ सप्टेंबर २०२३ : एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. एक भरधाव खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने १२ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात एका जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. ही घटना शनिवारी सकाळी ८:३० वाजता पिंपळकोठा ता. एरंडोलनजीक घडली.

4
एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात एक ठार, १२ प्रवासी जखमी 1

खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

2
एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात एक ठार, १२ प्रवासी जखमी 2

ही लक्झरी बस राजस्थानकडून जळगावमार्गे औरंगाबादकडे जात होती. पिंपळकोठानजीक एका छोट्या पुलाच्या कठड्यावर बस धडकली आणि खाली कोसळली. यात चालक ठार झाला असून १०- १२ प्रवासी जखमी झाले. यातील मृत चालकाचे नाव कळू शकले नाही.

3
एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात एक ठार, १२ प्रवासी जखमी 3

संततधार पावसाने चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.